क्षीण कोर चंद्राची झुरते पश्चिम क्षितिजावरती
शुक्र सांगतो थांब ऐकु दे व्यथा तुझी मज; पुरती
म्हणे काय करशील गड्या तू ही माझी पणती
तेल असे तोवर जळते उजळते ऋणांची नाती
जरी व्यस्त दूरस्थ तरी तो असे सोबती सांगाती
ओंजळी मागतो अंधार्या जाळण्यास एकल रात्री
आहेत किती अश्रू निर्मळ स्वातीचे अवखळ मोती
माळीन म्हणे अवगुंठुन ते चांदणे मांडुनी भवती